शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार की नाही??

 महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल, किंवा 50 हजार प्रोत्साहन रक्कम मिळेल, या भ्रमात अजिबात राहू नये.


महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल, किंवा 50 हजार प्रोत्साहन रक्कम मिळेल, या भ्रमात अजिबात राहू नये.


कालच आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत अजित पवार साहेबाना प्रश्न केला, तेव्हा आपल्या राज्याचे उपमुखमंत्री साहेबांनी सदर विषय सविस्तर महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी मायबाप शेतकऱ्यांना उत्तर दिले, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की पुढील अर्थसंकल्पा मध्ये अगोदर झालेल्या  2 लाखाच्या आता कर्ज माफी मध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळायचा बाकी आहे...त्यांचा विचार केला जाईल, आणि जे शेतकरी घेतलेलं पीक कर्ज नियमित भरत आहे त्यांना 50 हजार रुपये देऊ...


https://fb.watch/a6AWezRD4b/




असो,


सदर विडिओ आपण बघितल्या नंतर च कळेल की साहेब काय म्हटले...


आता आपण चांगला विचार केला तर आपल्याला लक्षात येईल.. की सरकार च्या सर्व विकास कामे ही जर तर च्या गोष्टी असतात...


त्यात आपण शेतकरी आपला उपयोग फक्त मतदान आल्यावर प्रचार, आणि चुकीचे आश्वासन देऊन, दिशाभूल करून फक्त आपली मत मिळवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात..


आपण आता मुख्य विषयावर बोलू....


1)महा विकास आघाडी सरकार कडें पुढील अर्थसंकल्पा मध्ये आर्थिक जमा पुंजी चांगल्या प्रमाणात असेल तर आपला विचार होईल..


2)येणाऱ्या काळात 3 रे

लॉकडाऊन लागले तर????


3)सरकार टिकेल याची हमी अजिबात नाही, म्हणजे आज सुद्धा काही होऊ शकते... अशी परिस्थिती आहे,, चांगल्या जानकर राजकारणी किंवा चांगले  राजकारण समजते अशा व्यक्तीला विचारा....


4)दुसरे सरकार आपल्याला काही मदत करेल असं गृहीत धरू नये..


5)पीक कर्ज आपण घेतले आहे व्याज आणि मुद्दल आपल्यालाच   नियमित च भरावे लागेल......


हे अगोदर लक्षात घ्यावे...



Comments

Popular posts from this blog

HDFC बँक पिक कर्ज आवश्यक कागदपत्रे 🌿