Posts

Showing posts from August, 2021

शेतकरी बांधवांनो निराश होऊ नका!🌱

Image
शेतकरी बांधवांनो निराश होऊ नका ! येणारे युग नक्की तुमचे आहे ! फक्त तुमची बलस्थाने तुम्हीं ओळखा तेलबिया, डाळी, दूध मांस, अंडी, अन्नधान्य या शिवाय जगाला तुमच्या शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.* कितीही जहागीरदार असला तरी त्याला तुमच्या शेताच्या बांधावर येण्या शिवाय पर्याय असणार नाही. तो नोटा दळून खाऊ शकत नाही की डाटा मळून त्याची भाकरी करू शकत नाही.फक्त तग धरा !! *कसल्या ही परिस्थितीत जगा, जास्तीत जास्त चारा पिके घेण्याचा प्रयत्न करा, गाई, बकऱ्या, म्हशी, शेळया, कोंबडया पाळा, मुबलक शेणखत निर्माण करा, रासायनिक शेतीचा अतिआग्रह टाळा, परत तेल बियांचे क्षेत्र वाढवा, तेलघाणे परत जिवंत करा, प्रक्रिया उद्योग उभारा, पन्नास साठ जण एकत्र येऊन शेतकरी कंपन्या स्थापन करा, गटशेती करा, गटाने एकत्र येऊन माल वाहतुकी साठी पिकअप, ट्रक यासारखी वाहने घ्या !  गावकी, भावकी, हेवेदावे, राजकारण याचा जाळ करा, बंधुभाव जोपासा, सडक्या पुढार्यांना त्यांची जशी काशी करायची आहे तशी करू द्या !* त्यांच्या नादी लागू नका विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांनी जरा टाळके ठिकाणावर ठेवा ! त्या मोबाईलचा जरा जाळ करा ! गरजे पुरता जरूर वा