Posts

Showing posts from June, 2021

💰कर्ज घेतलंय का ❓️तर मग परतफेड करताना या चुका करू नका.

Image
 💰 कर्ज घेतलंय का ? तर मग परतफेड करताना या चुका करू नका.....!!!💰 📍कर्ज घेतलंय? 'या' चुका अजिबात करू नका , तुम्हाला बसू शकतो मोठा फटका. काही जण क्रेडिट कार्डचं बिल भरण्यात किंवा ईएमआय भरण्यास उशीर करतात. तुम्ही ही बिलं 1-2 दिवस उशिरा भरत असाल, तर फार काही फरक पडत नाही. मात्र तसं करू नये. कारण एखादा दिवसही उशीर झाल्यास तुम्हाला लेट फी आणि त्या त्या कार्डच्या, कंपनीच्या पॉलिसीनुसार दंड भरावा लागतो. 🌱 📍आजकाल कर्ज (loan) सहज मिळतं. म्हणजे घर (home) घ्यायचं असेल किंवा कार (car) घ्यायची असेल, तर कर्ज मिळतंच, पण याशिवाय अगदी फोन (phone), टीव्ही (TV) फ्रीजसारख्या वस्तू घेण्यासाठीही कर्ज मिळतं. कर्ज घेणं आणि ते फेडणं सोपं झाल्यामुळे कर्ज घेतलं जातं. कर्ज केवळ बँकेकडूनच घेतलं जातं असं नाही, तर क्रेडिट कार्डवरून (credit card) खरेदी (shopping) करणं किंवा ईएमआयवर (EMI) अर्थात सुलभ मासिक हप्त्यांवर वस्तू घेणं, हेसुद्धा कर्जच आहे. 🌱 तुम्ही तुमच्या सभोवताली अशी माणसं पाहिली असतील, ज्यांचा सगळा वेळ पैसा कमावण्यात जातो, मात्र तरीही त्यांची बचत काही होत नाही. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हण